कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को. ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपुर. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत ०१ जून १९८८ रोजी स्थापन करण्यात आली.या संस्थेच्या स्थापनेत वीर सेवा दल संघटनेच्या कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाट आहे. लगतच्या कर्नाटक राज्यात शाखा विस्तार करणेसाठी ०४ एप्रिल २०१३ रोजी बहुराज्य सहकारी कायदा २००२ अंतर्गत परिवर्तीत झाली. आज संस्थेच्या 35 शाखा व 2 विस्तारित कक्ष कार्यरत असून सभासद संख्या ७२००० हून अधिक आहे. संस्था १० कोटी स्वभांडवल व ६० कोटी स्वनिधी अश्या मजबूत पायावर उभी असून , संस्थेचा एकत्रित व्यवसाय ९५० कोटी आहे.
       ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी सर्व शाखा कोअर बँकिंग सिस्टमशी जोडलेल्या आहेत.तसेच आधुनिक सोयीसाठी संस्थेमार्फत RTGS / NEFT सारख्या वेगवान सुविधा देण्यात आली आहे .तसेच हे सर्व व्यवहर संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे वापरणेचि सुविधाही उपलब्ध आहे. आपणा सर्वांनी दिलेला विश्वास, सहकार, प्रेरणा आणि सर्व नियम व कायद्यांचे सावधगिरीने पालन करून संस्थेने स्वीकारलेला शिस्तबद्ध मार्ग यामूळे संस्था जबरजस्त प्रगती सध्या करीत आहे.